Welcome To Marathi Department

'Marathi Department lecture'
'marathi department'
मराठी विभाग
मराठी विभागाविषयी:
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून (२००८) मराठी विभागात विशेष स्तरावरील मराठी विषयाचे अध्यापन केले जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाने तयार केलेल्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाचे अध्यापन करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. तसेच या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मराठी विभागाच्या वतीने 'अल्पमुदत प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जातो. सदर अभ्यासक्रम व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवून राबविला जातो. यातून विद्यार्थी आपला स्वयंरोजगार निर्माण करू शकतात. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, संशोधकीय दृष्टिकोनाचा विचार करून अभ्यासक्रमाधारित आणि अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
ध्येय (Aims) :
मातृभाषा मराठीच्या उपयोगितेचा विचार करून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, संशोधन, व्यावसायिक क्षेत्रात मराठीचे उपयोजन करणे. यासाठी साहित्याभिरुची असलेले विद्यार्थी निर्माण करणे. त्यातूनच मातृभाषा मराठीचे संवर्धन आणि विकास साधणे.
उद्दिष्ट्ये (Objective) :
१. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड आणि प्रेम निर्माण करणे.
२. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करणे.
३. विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची ओळख करून देणे.
४. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार आणि सर्जनशीलता वाढविणे.
५. विद्यार्थ्यांना मराठी संस्कृती आणि मूल्यांची जाणीव करून देणे.
उपक्रम (Activities) :
१. वाचन प्रेरणा दिन
२. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
३. मराठी भाषा गौरव दिन
४. जागतिक मातृभाषा दिन
५. अभ्यासपूरक शैक्षणिक सहल
६. विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या वक्तृत्त्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि प्रोत्साहन.
मराठी विषयातील व्यावसायिक संधी :
मराठी विषयाचे विशेष स्तरावर अध्ययन करून विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक संधी साधू शकतात.
१. शिक्षण- अध्यापन
२. प्रकाशन व्यवसाय
३. सर्जनशील लेखन
४. भाषांतर
५. पत्रकारिता
६. प्रशासनिक संस्था
७. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे
८. जाहिरात
९. स्पर्धा परीक्षा
१०. कलाभिनय
११. संवाद कौशल्य
१२. मुद्रितशोधन
१३. सूत्रसंचालन व निवेदन
अल्पमुदत प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( Short term course ) :
१. प्रमाणलेखन आणि मुद्रितशोधन
२. सूत्रसंचालन व निवेदन
Departmental Staff Details
अ.क्र | प्राध्यापकाचे नाव | पद | इमेल |
१ | डॉ. गणेश चौधरी | साहाय्यक प्राध्यापक | chaudhariganesh17@gmail.com |
२ | डॉ. दत्तात्रय फटांगडे | साहाय्यक प्राध्यापक | dattatrayfatangade5@gmail.com |
३ | प्रा. सिद्धार्थ नवतुरे | साहाय्यक प्राध्यापक | sidhunavture@gmail.com |
४ | डॉ. मनीषा खैरे | साहाय्यक प्राध्यापक | khaire.manishas@gmail.com |